अखेर ! त्या ‘थेरगाव क्‍विन’ लेडी डॉन वर गुन्हा दाखल ; अश्‍लिल भाषेचे आणि धमकी देणारे व्हिडिओ पोस्ट केल्याने वाकड पोलिसांकडून कारवाई…

थेरगाव I झुंज न्यूज : सोशल मीडियावर अश्‍लिल भाषेचे आणि धमकी देणारे व्हिडिओ पोस्ट करून व्हायरल केले. इन्स्टाग्रामवर ‘थेरगाव क्‍विन’ नावाने अकाऊंट चालविणाऱ्या दोन मुलींसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

शनिवारी (दि. २९) सायंकाळी सहाच्या सुमारास हे अश्लील भाषेचे व्हिडिओ पोलीस उपनिरीक्षक महिलेच्या मोबाईलवर आले. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली.

कुणाल कांबळे (रा. गणेशपेठ, पुणे) आणि थेरगाव आणि चिंचवड परिसरात राहणाऱ्या दोन तरुणी, अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस उपनिरीक्षक संगीता गोडे यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. २९) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,

थेरगाव येथे राहणारी मुलगी इन्टाग्रामवर ‘थेरगाव क्‍विन’ या नावाने अकाऊंट चालविते. तिने आणि इतर दोन आरोपींनी मिळून अश्‍लिल भाषा वापरून धमकीचे व्हिडिओ तयार केले. ते व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील अकाऊंटवर टाकले. तसेच ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले. सोशल मीडियावरील ही पोस्ट पाहून समाजातील मुलामुलींची नितीभ्रष्ट होण्यास व मानसिक स्थिती बिघडविण्यास आरोपी कारणीभूत ठरत असल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *