मारुंजी I झुंज न्यूज : नेहरू युवा केंद्र संघटन, पुणे युवक कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार आणि नितीन काकडे फाऊंडेशन यांच्या सयुक्त विद्यमाने भव्य तालुका स्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा नुकत्याच मारुंजी येथील सनफ्लॉवर पब्लिक स्कूल येथे घेण्यात आल्या.
या स्पर्धेचे उदघाटन सह्याद्री स्काऊटचे पुणे जिल्हा प्रमुख बिपिन देशमुख, सनफ्लॉवर पब्लिक स्कूलचे प्रिन्सिपल सदाशिव धांडे, यश ट्युटेरियलचे संचालक डी.एम.चव्हाण, एन. के. फाऊंडेशनचे अध्यक्ष नितीन काकडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या स्पर्धा लांब उडी, गोळा फेक, 100 मीटर, 200 मीटर, 1600 मीटर या पाच प्रकारात घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये हिंजवडी, माण, मारुंजी, घोटावडे, नेरे, कासरसाई, चांदखेड, यां गावांमधील खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून रुस्तमे हिंद अमोल बुचडे, माजी सैनिक रामदास मदने, सैनिक युवा फोर्स चे संचालक बारिया सर, मार्शल कॅडेट फोर्स चे सेक्रेटरी राजू गोसावी, एन के फाऊंडेशनचे उपाध्यक्ष सागर जगताप, सर्प मित्र तुषार पवार, एस.पी. स्कूल वाकडचे संचालक अंकुश बोडके, मराठा युवा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा उमा काळे हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन विजय बोत्रे, तर आभार प्रदर्शन सनफ्लॉवर पब्लिक स्कूलचे अध्यक्ष शिवाजी बुचडे यांनी केले.