वाकड I झुंज न्यूज : जादुटोणाची भीती दाखवून महिलेकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या भोंदूबाबाला वाकड पोलिसांनी अटक केली. ही कारवाई डांगे चौक येथे करण्यात आली.
विलास बापूराव पवार उर्फ महाराज (वय ४१, रा. मु. पो. पिंपळवंडी, ता. पाटोदा, जि . बीड) असे अटक केलेल्या भोंदूबाबाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
आरोपीने फिर्यादी यांना मोबाईलवरून फोन करून महिलेच्या पतीने त्यांना कमरेच्या खाली पांगळे करण्यासाठी सांगितल्याच्या फिर्यादीला म्हणाला. तसेच पीडित महिला व त्यांच्या पतीचे नियमित होणाऱ्या भांडणाबाबतही माहित असल्याचे महिलेला सांगितले. यश महिलेच्या पोटात दोन , तीन गाठी असल्याचे सांगून तिचे आयुष्य थोडेच राहिले असल्याचे सांगत पीडित महिलेला भीती दाखवून वारंवार फोन करून महिलेशी जवळीक साधणयाचा प्रयत्न केला.
त्यानंतर ज्या व्यक्तीच्या शरीरावर ठराविक ठिकाणी तीळ आहे, त्याच्याशी तुम्ही शारीरिक सबंध ठेवल्यास तुम्हाला कोणीही काहीही करून शकणार नाही, असे महिलेला सांगितले. त्यानंतर त्याने स्वतःचा एक अश्लील व्हिडीओ पाठवून त्यात तीळ असल्याचे दाखविले होते.
हा व्हिडीओ पाठविल्यानंतर पुन्हा पीडित महिलेला कॉल करून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. तसेच माझ्याशी शरीरसबंध ठेवल्यास तुमचे सगळे कुटुंब सुखी राहील. कुटुंब सुखी ठेवायचे असले तर माझ्याशी शरीरसबंध ठेवा असे म्हणत वारंवार शरीरसुखाची मागणी केली.
याप्रकरणी पीडित महिलेने वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आरोपीवर विनयभंग, माहिती तंत्रज्ञान अधिनियम, नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा याना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
या आरोपीला डांगे चौक येथे सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.