सुमधूर गीतांच्या मैफिलीत रंगल्या गप्पा ! ; स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने मराठवाडा मित्र परिवाराचा आनंदोत्सव

पिंपरी I झुंज न्यूज : पिंपरी-चिंचवड शहरातील मराठवाडावासीय मित्र परिवाराने स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला. सुमधूर गीतांच्या मैफिलीचा आनंद लुटत स्वादिष्ट फराळाचा आस्वाद घेत सर्वजण गप्पांमध्ये रमले होते. थेरगाव येथील कैलास मंगल कार्यालयात मराठवाडा मित्र परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या दिवाळी फराळ व वार्षिक स्नेहमेळाव्याला पिंपरी चिंचवडमधील दोन हजाराहून अधिक मराठवाडावासीय मित्र परिवाराची उपस्थिती होती.

प्रमुख पाहुणे म्हणून वाकड पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, की प्रत्येक माणसाने एकमेकांशी सौजन्याने वागून संघटनेच्या माध्यमातून अडीअडचणीच्या वेळी मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे. सामाजिक कार्यकर्ते अरूण पवार,धनाजी येळकर पाटील व मराठवाडा मित्र परिवार सातत्याने हे कार्य करत आहेत.

मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरूण पवार यांनी गेल्या १५ वर्षापासून केलेल्या कार्याचा आढावा घेताना सांगितले, की पिंपरी-चिंचवडमधील सर्व मराठवाडा वासियांना हक्काचे व्यासपीठ म्हणून शहरात मराठवाडा भवन निर्माण होणे गरजेचे आहे. आपापसात मदत करण्यासाठी, तसेच आपल्या माणसांना सर्वच क्षेत्रात ताकद देण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहण्याचा संकल्प करू.

“मराठवाड्यासह,कोकण, खान्देश,पश्चिम महाराष्ट्रासह इतर विभागातून स्थाईक झालेल्या बांधवांच्या हक्काच्या घरांचा प्रश्न आणखीही सोडवला गेला नाही, प्राधिकरण बरखास्त करून सर्व ठेवी व काही भूखंड पीएमआरडीए व महापालिकेत वर्ग करण्यात आल्या परंतु सर्वसामान्यांना त्यांच्या घरांचा सातबारा (प्रॉपर्टी कार्ड)कोणतेच सरकार देऊ शकले नाही. ४९ वर्षानंतर सुद्धा घरे नावावर होत नाहीत याला जबाबदार कोण ? असा सवाल करत निवडणुकी अगोदर घरे नावावर झाली तर ठीक अन्यथा येणाऱ्या २०२२ च्या महापालिका निवडणुकीत घर बचाव संघर्ष चळवळ जो उमेदवार ठरवेल त्याच्या पाठीशी उभे राहून त्याला निवडून आणण्याचा संकल्प करून कामाला लागण्याचे आवाहन घर बचाव चे मुख्य समन्वयक आणि छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर पाटील यांनी सर्वांना केले. तर काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष कैलास कदम यांनी प्रत्येक अडचणीत तुमच्या सोबत आहे असे आश्र्वासन देत मराठवाडा भवणासाठी १ लाखाची मदत जाहीर केली.

यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, छावा मराठा युवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर, मराठवाडा मित्र परिवाराचे श्रीमंत जगताप, प्रकाश इंगोले, ह.भ.प. गजानन महाराज वाव्हळ, सामाजिक कार्यकर्ते उमेश गुंड, सामजिक कार्यकर्ते शशिकांत दुधारे, सामाजिक कार्यकर्ते संदीप राठोड, छावा मराठा युवा महासंघाचे महासचिव मनोज मोरे,महिला प्रदेशध्यक्ष रुपालीताई राक्षे,अर्चना मेंगडे,सुनीता फुले,मनीषा सुतार उद्योजक राधाकृष्ण मिटे, अभियंता श्री. सावंत आदींनी मनोगत व्यक्त केले.

स्नेहमेळाव्याला उद्योजक संदीप राठोड,युवक काँग्रेसचे नरेंद्र बनसोडे, उद्योजक शंकर तांबे, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत दुधारे, समाजप्रबोधनकार शारदाताई मुंडे, ह.भ.प. तांदळे महाराज, समाजसेवक अमोल नागरगोजे, आदिवासी सह्याद्री मंडळाचे सदस्य विष्णु शेळके, सामाजिक कार्यकर्ते सुभाष दराडे, उद्योजक बाळासाहेब काकडे, सुखदेव वानखेडे, संतोष जाधव, उत्तम घुगे, जि. प. सदस्य दत्ताजी शिंदे, समाजसेवक गोरख मोरे, माधव मनोरे, अभिमन्यू गाडेकर, मराठी विद्यार्थी समितीचे अध्यक्ष मारुती आवरगंड, मराठवाडा जनविकास संघाचे सचिव सूर्यकांत कुरुलकर, स्वीकृत नगरसेवक गोपाळ माळेकर, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष नरेंद्र माने, वामन भरगंडे, दत्तात्रय धोंडगे, अण्णा जोगदंड, रविकांत पाटील, अनिसभाई पठाण, गुलजार शेख, नासिर खान, अपना वतन संघटनेचे सिद्दिक शेख, मैनुद्दीन शेख,संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे, विठ्ठल कदम, माजी नगरसेवक शिवाजी पाडुळे, शिवसेनेचे उपशहरप्रमुख हरीष नखाते, छावाचे प्रदेश संपर्क प्रमुख गौरव धनवे, राजेंद्र पवार, विजय लोट, अक्षय कांबळे, योगेश रेनवा,अर्जुन जाधव, पी.जी.नाना तांबारे, आदी उपस्थित होते. तसेच मराठवाड्याच्या विविध भागातून आलेले व पिंपरी चिंचवड येथे स्थायिक नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रशांत फड यांनी, सूत्रसंचालन शिव व्याख्याते प्रा. संजय टाक यांनी केले. तर उद्योजक उमेश गुंड यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *