मुळशी I झुंज न्यूज : वंचित बहुजन आघाडीची मुळशी तालुका कार्यकारिणी गठीत करण्यासाठी पुणे जिल्हा पश्चिम च्या वतीने कासार आंबोली येथे मुलाखत व कार्यकर्ता संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा अध्यक्ष मा. कमलेश उकरंडे साहेब, महासचिव मा. अजय खरात, सचिव मा. राहुल इनकर, संघटक मा. रामभाऊ मरगळे तसेच सदस्य मा. उत्तम वणशिव व शिंदे साहेब यांनी जिल्हा पदाधिकारी म्हणून जबाबदारी पार पडली.
मुळशी तालुक्यातून कार्यक्रमाचे आयोजन वंचित बहुजन आघाडीचे नेते मा. नितीनभाऊ ओव्हाळ, वंचित बहुजन आघाडीचे नेते मा. प्रशांतभाऊ कांबळे व वंचित बहुजन आघाडीचे नेते मा. अशोक ओव्हाळ यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुळशी तालुक्यातून जास्तीत जास्त तरूण वर्ग उपस्थित होता.