स्वार्थी रक्षाबंधन – (कवी : संतोष चव्हाण)

रक्षाबंधनाची घाई 

राखी बांधना ग ताई 

वर्षभर जरी नाही जमलं 

तरीही मी येतो म्हणलं 

 

कधी सुटेल लोभ,मोह 

मनास न सुटे मैत्री स्वार्थी

खरंच का ग नाती 

झालीत पुरती स्वार्थी 

 

भाचे म्हणतात ,आता

केवळ कामापुरता मामा 

गरज असते तेव्हा 

कधी आला नाही कामा 

   

 

कवी,

संतोष चव्हाण

चिखली, पुणे

९८५०१२७६९४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *