पिंपरी I झुंज न्यूज : वैष्णवी फूड इंडस्ट्रीज, अरुण पवार, बालाजी पवार, काळू बापू ननावरे मित्र परिवार आणि मराठवाडा जनविकास संघ, पिंपरी चिंचवड शहर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त तुळजापूर (खुर्द) परिसरात आई तुळजाभवानीच्या विश्रांतीस्थळाचे बांधकाम आणि दीपमाळेचे संपूर्ण नूतनीकरण पूर्ण करण्यात आले.
तुळजाभवानी देवीच्या भक्तांच्या विश्रांतीस्थळाचा आणि दीपमाळेचा लोकार्पण सोहळा तुळजापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी अरुण पवार यांच्या मातोश्री शकुंतला पवार, पंडितराव जगदाळे, आबा कंदले, काळूबापू नन्नवरे, दत्तात्रय पवार, जयसिंग पाटील, सोमनाथ कोरे, रत्नाकर खांडेकर, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सचिन रोचकरी यांनी अरुण पवार व बालाजी पवार यांच्या कार्याचा गौरव केला आणि त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. विश्रांतीस्थळ परिसरामध्ये मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले. उपस्थितांचे आभार रत्नाकर खांडेकर यांनी मानले.
“मराठवाडा जनविकास संघ (महा.राज्य) ही संस्था गेल्या 10 वर्षापासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये कार्यरत आहे. तसेच पिंपरी-चिचवड शहर सोडून संपूर्ण महाराष्ट्रभर मराठवाडा जनविकास संघातर्फे वेगवेगळ्या प्रकारे कार्य राबविले जातात. ही संस्था वृक्षारोपण करून त्या वृक्षांचे ३ ते ४ वर्ष संगोपन करते. आतापर्यंत कित्येक गोरगरीब, गरजू विद्यार्थी, विद्यार्थिनीना, शालेय शैक्षणीक मदत तसेच मुक्या प्राण्यांची सेवा, वारकरी सेवा मराठवाडा जनविकास संघातर्फे करण्यात आलेली आहे.