शिरूर I झुंज न्यूज : ग्रामीण कृषी जागृकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत दहिवडी , सातकर वस्ती येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय हळगाव या महाविद्यालयाचा विद्यार्थी “वैभव ईश्वर सातकर” याने शेतकऱ्यांना माती परीक्षण , बीज प्रक्रिया, एकात्मिक तण व्यवस्थापन, आंबा कलम , निंबोळी अर्क, शून्य उर्जेवर चालणारे शीतगृह इत्यादी प्रात्यक्षिके राबवण्यात आली.
यावेळी कृषी दूताने खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, पीक फेरपालट याबद्दल मार्गदर्शन करून जमिनीचे आरोग्य टिकवण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मिलिंद अहिरे, डॉ. विकास भालेराव , डॉ. एस एस सदाफळ इत्यादी प्राध्यापकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभत आहे.
यावेळी प्रगतशील शेतकरी वाल्मीक सातकर, चंद्रकांत सातकर ,सुखदेव धुमाळ , रामभाऊ सातकर , दशरथ सातकर, संतोष सातकर, संग्राम सातकर, संकेत सातकर इत्यादी शेतकरी उपस्थित होते.